देश-विदेश
ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन ,74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुख्य संपादक

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन ,74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दिनांक 6/2/2025.
आपल्या ओघवत्या शैलीतील लिखाणामधून आणि खुमासदार विश्लेषणामधून द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेटप्रेमींमध्ये आपला खास असा वाचकवर्ग निर्माण करणारे प्रख्यात क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. मागच्या काही काळापासून ते कर्करोगाशी मोठ्या धैर्याने झुंजत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.