आदिवासी शेतकरी समाजाचा वनविभाग कार्यालयावर, कुटुंबासह चार दिवसापासून ठिया आंदोलन !
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी :- प्रफुल उराडे

आदिवासी समाजाचा वनविभाग कार्यालयावर कुटुंबासह चार दिवसापासून ठीया आंदोलन !
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रफुल उराडे ✍️✍️
मो. नं.७७२१०२२६८४
चंद्रपूर / ( पोंभुर्णा)
पोंभुर्णा तालुका परिसरातील आदिवासी शेतकरी समाजाचा आंदोलनाचा आज चौथा दिवस असुन दिनांक 17 तारखेपासून आंदोलन सुरू असुन वनविभाने या आंदोलनाला कुठलाही पाठींबा न दिल्याने पोभुर्णा येथील ईको पार्क या मैदानात आदिवासी शेतकरी आंदोलन कर्त्यानी वनविभाग शासनविरुद्ध ठिया आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलन कर्त्यांचा चौथा दिवस असुन आपल्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतला जाणार नाही असा इशारा आदिवासी शेतकरी आंदोलन कर्त्यानी वनविभाग शासनाला दिला असुन आदिवासी शेतकरी आंदोलन कर्त्यांच्या मागण्या १) सुरजागड लोहखणीज वाहन बंद करण्यात यावा 2) चंद्रपुर जिल्हा मधील जबरान जोत शेतकऱ्यांना वणहक्क पकेपटे देण्यात यावे. अशा विविध मागण्या घेवून आदिवासी शेतकरी आंदोलनात आप आपल्या कुटुंबासह सहभागी झाले असुन पोंभुर्णा वनविभाग कार्यालयासमोर रात्र – दिवस उन्हाताणात नारेबाजी करत आंदोलन कर्त्यांचे चार दिवसापासून आंदोलन सुरूच आहे.