
अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई
विस लाख विस हजारांचा मुद्देमाल जप्त, चालकासह मजूर पोलीसांच्या ताब्यात .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
भद्रावती:-
दि 24 जाने 2024
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगली गावाच्या नजीक असलेल्या नाल्यामधून रेतीची ट्रॉक्टरने तस्करी करीत असताना पोलिसांनी पकडले व कारवाई करण्यात आली आहे.
मांगली नाल्यात भरपुर मोठ्या प्रमाणावर नैसर्गीक रेतीचा साठा असल्याने त्या नाल्यामधून रात्रीदरम्यान रेती तस्करांकडुन अवैद्यरित्या रेतीची सतत चोरी होत असल्याची माहीती दिनांक २४/०१/२०२४ चे रात्रौदरम्यान ‘भद्रावती पोलीसांना प्राप्त झाली होती .
त्या अनुशंगाने भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी रेती तस्करांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशन भद्रावती येथील सपोनि राहुल एस किटे पोहवा धर्मराज मुंडे ,चालक पो. हवा. जगदिप, नापोअ जगदिश झाडे, नापोअ निकेष बेंगे, ना.पो.अ. विष्वनाथ चुदरी यांचे पथक तयार करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यावरून दिनांक २४/०१/२४ रोजी मांगली येथील नाल्याजवळ रात्रौदरम्यान पंचासह सापळा रचुन मांगली नाल्यामधुन एकापाठोपाठ एक असे एकुण चार ट्रॅक्टर येत असतांना दिसल्याने त्यांना नाल्यामध्येच थांबवुन पंचासमक्ष ट्रॅक्टरची पाहणी केल असता त्यामध्ये प्रत्येकी १ ब्रास प्रमाणे एकुण ४ ट्रॅक्टरमध्ये ४ ब्रास रेती अवैद्यरित्या चोरी करून घेवुन जात असतांना मिळुन आले.
त्यावरुन विना क्रमांचा एक महिंद्रा ट्रॉक्टर, MH 29 V1713,
MH 32 B 1177 व लाल रंगाची ट्रॉली MH 34 L 9081, MH 36L2151, असे चार वाहन व आरोपी १) प्रजीत सुभाष खामनकर वय २६ वर्ष २) समीर बंडू चौधरी वय २१ वर्ष ३) आशिक नामदेव कोटनाके वय २८ वर्ष , ४) विकास भिमराव कोटनाके वय ३० वर्ष ५) महेन्द्र महादेव बोढेकर, वय २४ वर्ष, व मजूर रितीक अजाब पाटील, वय २१ वर्ष, सनी कमलाकर कुमरे, वय २४ वर्ष , मनोहर चिंदु कोटनाके, वय ४० वर्ष , अमोल परशुराम कोटनाके, वय ३० वर्ष , तुकाराम अशोक बोढेकर, वय २९ वर्ष, गणेश वसंता डेंगळे, वय ३० वर्ष, सर्व रा.मांगली व पाहीजे असलेले ट्रॅक्टर मालक आरोपी नामे राकेश कामटकर रा. सुमठाना भद्रावती ,रूपेश उरकुडे रा. सुमठाना भद्रावती , श्रीकृष्ण जिवतोडे रा. गवराळा भद्रावती , भारत बोढेकर रा. मांगली ता. भद्रावती त्यांचेवर कलम ३७९,३४. भा.दं. वि. प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.