
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान।…
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
दिनांक 17/11/2024.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एक मोठी उपलब्धी नोंदवण्यात आली आहे. आफ्रिकन देश नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना नायजेरियाने ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ (GCON) या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापूर्वी हा सन्मान फक्त राणी एलिझाबेथ यांना मिळाला होता. म्हणजेच, हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी नेते आहेत. हा पंतप्रधान मोदींचा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.