देश-विदेश
200 रुपये साठी देशासोबत विश्वासघात पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरात मधून अटक
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

200 रुपये साठी देशासोबत विश्वासघात पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरात मधून अटक ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 2/12/2024.
गुजरात ,
गुजरातच्या किनारपट्टीवरील एका खाजगी कंपनीत काम करणारा मजूर दररोज २०० रुपये मिळावेत म्हणून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, असा धक्कादायक खुलासा गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने केला आहे.
गुजरातमधील द्वारका येथे काम करणारा दीपेश गोहिल फेसबुकवर असिमा या कथित पाकिस्तानी नौदलातील महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात होता. गोहिलने द्वारकेतील ओखा भागातून संवेदनशील फोटो गोळा केले आणि ते पाकिस्तानला पाठवले, अशी माहिती एटीएसने दिली.
भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपाखाली गुजरात एटीएसने दीपेश गोहिलला अटक केली आहे.