न्याय मिळत नसल्याने संतोष देशमुख यांचे कुटुंब करणार अन्नत्याग आंदोलन ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम

न्याय मिळत नसल्याने संतोष देशमुख यांचे कुटुंब करणार अन्नत्याग आंदोलन ।
दिनांक 26/2/25.
तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंबियांसह, महिला व गावकऱ्यांच्या सहभागाने मंगळवारी सकाळी 10 वाजल्या पासून महादेव मंदिरासमोर सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी रात्री 9 वाजता झालेल्या बैठकीत सर्व ग्रामस्तानी एकमताने जाहीर केली. 25 फेब्रुवारी पासून सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना यापूर्वीच देण्यात आले होते.परंतु सोमवारी रात्री 9 पर्यंत प्रशासनाकडून गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत त्यामुळे सामूहिक अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय गावाकऱ्यांनी घेतला आहे.