
डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आंबोली व किष्टापूर येथे अपमानास्पद लिखाण करणाऱ्या ,आरोपीला पकडण्यात आष्टी पोलीसांना यश आरोपी गजाआड ….
गडचिरोली
आष्टी ,26
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानास्पद लिखाण करणाऱ्या आरोपीस आष्टी पोलिसांनी केली अटक आरोपी नामे . अभिजीत मोरेश्वर मोहुलेँ वय 37 वर्ष रा. सोमनपल्ली ता.चामोशीँ जि.गडचिरोली येथील रहिवाशी असून यास आष्टी पोलिसांनी अटक केली आहे.तर आरोपीस न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे.
तसेच या प्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 299 BNS तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 3(1)(v) ,3(1) ( u)अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय अधिकारी अहेरी अजय कोकडे प्राणहिता अहेरी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
बौद्ध अस्मिता आरक्षण समिती सर्कल येनापुर यांचे कडून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शक्य झाले आहे .व आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत बौद्ध अस्मिता रक्षण समिती व अध्यक्ष श्री काजल मेश्राम यांनी आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्यांच्या संपूर्ण पोलिस दलाचे विशेष आभार मानले आहे.
तसेच बौद्ध अस्मिता रक्षण समिती येनापुर आणि परीसरातील संपूर्ण बौद्ध बांधव यांनी दाखविलेल्या एकजुटीबद्ल कृतज्ञता व्यक्त केली आहे या घटनेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद लिखाण व वर्तन करणाऱ्या विरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल ,असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.