एसीबीच्या जाळ्यात अडकला आलापल्ली महावितरणचा उप कार्यकारी अभियंता – विनोदकुमार भोयर !
मुख्य संपादक - संतोष मेश्राम
एसीबीच्या जाळ्यात अडकला आलापल्ली महावितरणचा उप कार्यकारी अभियंता- विनोदकुमार भोयर .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मुख्य संपादक
संतोष मेश्राम
गडचिरोली / आलापल्ली
दि. 17 / 2023 .
विनोदकुमार नामदेवराव भोयर (४७) वर्षे. २० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ लाचलुचपत विभागाने अटक केली आहे . तक्रारदारास त्याच्या घरगुती मिटर मद्ये फाल्टि असल्याचे कारण सांगुन दंडाची रक्कम कमी करुन देण्यासाठी त्याचा मोबदला ४० हजार रुपयाची लाचेची मागणी करुन पहिला टप्पा २० हजार रुपये व दुसरा टप्पा काही दिवसात देण्याचे ठरले होते. आज २० हजाराचा पहिलाच हफ्ता विद्युत विभाग कार्यालय आलापल्ली येथे घेतांनाच लाचखोर अभियंता विनोदकुमार भोयर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असुन विद्युत विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदारला २ लाख २० हजार दंड भरावे लागणार असे बोलुन सदर दंडाची रक्कम कमी करुन ७३ हजार ६९८ रुपयाचा दंड केला व सदर दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून भोयर यांनी तक्रारदारास ४० हजार रुपयाची मागणी केली. मात्र तक्रारदाराला पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार दाखल केली व तक्रारीच्या अनुषंगाने अत्यंत गोपनीयरित्या सापळा रचून पहिला टप्पा म्हणुन २० हजाराची लाच घेताना पहिल्याच टप्यात लाचखोर अभियंता विनोदकुमार भोयर हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला.
तसेच लाचखोर अभियंता विनोदकुमार भोयर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरु असुन वरोरा ( चंद्रपूर) येथील त्याच्या निवासस्थानी सुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर तर्फे झडती घेण्यात येत आहे .