महागाव येथे लागोपाठ पाच जणांच्या मत्युने हादरले महागाव, एकाच कुंटुंबातील चौघाचा समावेश अंत्यविधी साठी आलेल्या मावशीने सोडला प्राण .
मुख्य संपादक
महागाव येथे लागोपाठ पाच जणांच्या मत्युने महागाव हादरले
एकाच कुंटुंबातील चौघाचा समावेश अंत्यविधी साठी आलेल्या मावशीने सोडला प्राण
अहेरी / महागाव
अहेरी तालुक्यातील महागाव( बु) येथे 24 तासाच्या अंतरात पती- पत्नीचा मु्त्यु झाला असुन 8 आँक्टोबर ला मुलानेही अखेरचा श्वास घेतला. सर्वजणांनी चंद्रपूर व नागपुर येथे उपचारादरम्यान प्राण सोडला. 20 दिवसाच्या आत पाच जणांच्या मु्त्युने एकच खळबळ उडाली आहे.
22 सप्टेंबरला रात्री जेवण झाल्यानंतर विजया शंकर कुंभारे (45)याची तब्बेत अचानक बिघडल्याने अथका व डोकेदुखी जाणवु लागल्याने पती शंकर कुभारे यांनी स्वतः च्या कारने चंद्रपूर येथे पत्नीला नेले असता पतीला हि अस्वस्थ वाटु लागले त्यामुळे पत्नी व पतीला दोघांना चंद्रपूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु दोघांची प्रक्रूती बिघडल्यामुळे नागपुर येथे हलविले असता उपचारादरम्यान पती शंकर कुंभारे (52)वर्ष दि. 26 रोजी तर दि. 27 रोजी पत्नी विजया शंकर कुंभारे( 45) वर्ष याची प्राणज्योत मावळली .
आई वडीलाची तब्बेत बिघडली तेव्हा त्याची मुलगी कन्या कोमल विनोद दहागावकर (29) रा. गडअहेरी ता अहेरी वरुन माहेरी आली होती तिचिही प्रक् ती बिघडली असता चंद्रपूर येथून उपचारादरम्यान बरी होऊन धरी परतली परंतु मात्र पुन्हा अस्वस्थ लागलेअसता अहेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु चंद्रपूर
येथे हलवीले असता 8 आँक्टोबर ला वाटेतच तिने प्राण सोडले.
आई वडिलांच्या निघनामुळे नंतर मुलगा रोशन कुंभारे याची तब्येत बिघडली त्याला चंद्रपूर नेले तिथून नागपुरला हलवले असता 15 आँक्टोबर ला त्याचाही मु्त्यु झाला .असता त्याची मावशी आनंदा उराडे (50) रा.वेडगाव ता.मुल जि.चंद्रपूर ही अंत्यविधिसाठी महागाव ला आली होती ती देखील आजारी पडली व चंद्रपूर येथे उपचारादरम्यान 14 आँक्टोबर रोजी प्राणज्योत मावळली .
रोशनची पत्नी व चालकावरही उपचार सुरू
रोशन कुंभारे याची पत्नी संघमीत्रा हिच्यावर नागपुर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. रोशन व संघमित्रा याचा काही महिण्यापुविँच प्रेम विवाह झाला होता. रोशनचा आई वडिलांना रुग्णालयात उपचारासाठी नेणारा वाहन चालक राकेश मडावी (२८) रा.महागाव याचीही प्रक् ती खालावली असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
संपूर्ण गावात व नातेवाईकात शोककळा पसरली आहे. तसेच संपूर्ण कुंटुंब उद्ध्वस्त झाले आहे.