
दुचाकीची बैलगाडीला धडक दुचाकीस्वार जागीच ठार…..
मुख्य-उपसंपादक
स्वप्निल मेश्राम ✍️✍️
चंद्रपूर :-
पोंभूर्णा (दि.३१):- तालुक्यातील वेळवा येथील घटना आज रात्रौ ८ वाजताच्या सुमारास घडली असुन सदर दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. ठार झालेल्या दुचाकीस्वार युवकाचे नाव पंकज निळकंठ भोयर वय (२७) वर्षे रा.वेळवा येथील आहे.
पंकज भोयर हा काही कामाकरीता वेळवा येथुन नवेगाव मोरे कडे जात असताना नवेगाव मोरे कडून शेतीतील कामे आटपून बैलगाडी घेवुन किर्मराव सखाराम कन्नाके वय (६०) वर्षे. रा.वेळवा यानी वेळवा कडे येत होते.दरम्यान दुचाकीस्वाराचे नियंत्रण चुकल्याने बैलगाडीला धडक बसली त्यात दुचाकीस्वार पंकज भोयर हा जागीच ठार झाला असुन पोंभूर्णा रुग्णालयात शवविच्छेदनाकारीता पाठविण्यात आले.तसेच बैलगाडीचा बैल जखमी झाला असुन पुढील तपास पोंभुर्णा पोलिस करीत आहेत