
कँनडात बस स्टाँपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या, हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी।
कँनडात ,
दिनांक 21/4/25.
पंजाब मधील विद्यार्थ्यांनीची हत्या …
परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. गुरुवारी कॅनडातील हॅमिल्टनमध्ये बस स्टॉपवर पंजाबमधील एका विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांच्या निशाण्यावर भारतीय विद्यार्थीनी नव्हती असे पोलिसांनी सांगितले. हॅमिल्टन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गोळीबार संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास झाला. विद्यार्थिनीचे नाव हरसिमरत कौर रंधावा होते आणि ती पंजाबमधील तरनतारनची रहिवासी होती. हरसिमरत रंधावा मोहॉक कॉलेजची विद्यार्थिनी होती.