फुले वार्डात पाण्याचा भीषण दुष्काळ!
गडचिरोली .
दि. 29 /03/2024.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
गडचिरोली शहरातील फुले, आंबेडकरी, वार्डामध्ये मार्च, महिना संपण्या अगोदरच फुले वार्डात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली असून,वार्डतील अनेक लोकांना पाण्यासाठी इतर लोकांच्या दारोदारी भटकावे लागत आहे.
ज्या,ज्या लोकांकडे टिल्लू पंप आहेत. त्या त्या लोकांनी टिल्लू पंपाचा खुले आम वापर करून पाण्याचा अवैध उपसा करताना दिसत असून .काही स्वतःच्या गाड्या धुण्यासाठी तर काही घरबाधणीसाठी सरास उपयोग करताना दिसत आहेत.
शहरातील, व वार्डतील काही टिल्लू पम्पधारकांनी राजकीय हितसंबंध जोपासुन खुलेआम टिल्लूपंपाचा सरास वापर करताना दिसत आहेत.
सदर ही बाब नगरपरिषद प्रशासनाच्या सतत निदर्शनात येत असताना सुद्धा नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे हेतू पूरसंपूर या बाबीकडे दुर्लक्ष करून
टिल्लू पंप धारकांना अभय देताना दिसत आहेत.
टिल्लूपंप धारकांच्या नगर प्रशास णाकडे अनेकदा तक्रारी करून सुधा.नगर प्रशासन तात्पुरते टिल्लू पंप आपल्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर कुठलीही फोजदारी कारवाही नं करता.नामधारी जप्त केलेले टिल्लूपंप टिल्लूपंप धारकांच्या लगेच स्वाधीन करताना दिसत आहेत.
याला सर्वस्वी नगरप्रशासन जबाबदार म्हणावे लागेल.
ज्यांना पाण्याचा थेंबही भेटत नाही त्यात्या अन्याय ग्रस्त लोकांनी,नगरपरिषदचा टॅक्स न्यायालयातून देण्याचा निर्धार केलेला आहे.
माजी नगरसेविका विमलताई मेश्राम यांच्या नळालाअनेक दिवसापासून पाणीच येत नसल्यामुळे पाण्यासाठी त्यांना सुद्धा इतरांच्या घरी वणवन भटकावे लागत आहेत.
आंबेडकर वार्डातील ही भीषण समस्या केव्हा दूर होणार.याला जबाबदार कोण.?