वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नावे सांगून अहेरी परिसरातील तलाठ्यानी सुरु केला पैसे वसुलीचा गोरख धंदा!
दि 18/5/24.
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली.
अहेरी ।
अहेरी तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या व अहेरी तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले तलाठी श्री. व्यंकटेश जेल्लेवार महागावं (खुर्द ) श्री.सचिन मडावी चिंचूगुंडी, व श्री.रवी मेश्राम कोडसेपल्ली परिसरातील व शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या तीन्ही तलाठ्यांनी संगनमत करून. राजधानी अहेरी येथे वास्तव्य करीत असलेले ठेकेदार श्री. फैजान . युसूफ खान यांची दिनांक ०८.०५.२०२४.व दिनांक ११.०५.२०२४ ला त्याची प्रत्यक्ष भेट घेवुन पटवारी श्री. व्यंकटेश जेल्लेवार महागावं (खुर्द ) यांनी तुम्हास रॉयलटी काडण्याची काही आवश्यकता नाही . तूम्ही एक काम करा अगोदर मला 10 हजार रुपये दया ? व तुमचे ठेकेदारी काम सतत सुरू ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे.
तसेच श्री.सचिन मडावी चिंचूगुंडी, व श्री.रवी मेश्राम कोडसेपल्ली,या दोन्ही तलाठ्यानी ठेकेदार यांच्याकडे जावून व तहसिलदार साहेबांनी पाठवुन तुमच्या सुरू असलेल्या गाड्या जप्त करण्याचा आदेश देवून एक लाख रुपये द्या ! अशी रक्कमेची मागणी सुधा केलेली आहे.
सबंधित तहसील दारानी सदर घटीत घटनेची योग्य चौकशी करून शासकिय सेवेत कार्यरत असलेल्या सबंधित तिन्ही भ्रष्ट तलाठ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची व त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा भ्रष्टाचार समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर धोलने यांनी एका निवेदनातून केलेली आहे.