Breaking
अपघातब्रेकिंग

ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडले: समीक्षाचा जागीच मृत्यू

मुख्य संपादक

 

 

ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडले: समीक्षाचा जागीच मृत्यू  .

 

 

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज

बाजार समितीच्या गाळ्यां जवळील कॉर्नरवरील घटना….

 

ब्रह्मपुरी... येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात  अकराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या अंगावरून ट्रक गेल्याने ट्रक खाली दबून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १२जानेवारी२०२४ रोजी दुपारी ११:४५ वाजेच्या दरम्यान नेवजा बाई हितकारणी कन्या विद्यालय गेट समोर ते बाजार समितीच्या गाळे बांधकाम केलेल्या कॉर्नरवर जवळ घडली.

समीक्षा संतोष चहांदे वय (१७)वर्ष असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ती मालडोंगरी येथील रहिवासी होती.
समीक्षा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती आज शाळेत जात होती. ट्रक येत असल्याचे पाहून ती बाजूला होण्याचा प्रयत्न केला असता अरुंद रस्ता व रस्त्यावर खड्डे असल्यामुळे रस्त्यावरून बाजूला होण्याच्या नादात तिची सायकल स्लिप होऊन ती ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली. त्यातच हा अपघात घडला असल्याचे अंदाज वर्तविला जात आहे.प्रतीक्षाच्या अंगावरून ट्रक गेल्याने ती चिरडली गेली. व घटनास्थळी तिचा मृत्यू झाला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी  गर्दी केली. व काही क्षणातच पोलिसांना प्राचारण करण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर ट्रक व  ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे