
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भिषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दांतेवाडा:
दिनांक 5/10/2024.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्या परिसरात चकमक सुरू असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाली आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रे-दारुगोळा जप्त करण्यात आली आहेत.
छत्तीसगडच्या दंतेवाडा नारायणपुर जिल्हाच्या सीमेवर असलेल्या ओरडा पोलीस ठाण्याच्या हद्दतील नेंदुर आणि थुलाथुली गावामधील जंगल परीसरातील दक्षिण अबुझाडमध्ये ही चकमक उडाली. विशेष म्हणजे या चकमकीत नक्षलांचा एक मोठा कँडर ठार झाल्याचे कळते.घटणास्थळावरून AK47 SLR LMG सारखी शस्त्रे जप्त करण्यात आली. या चकमकीत नक्षलाना मोठा हादसा बसला आहे. आणि तसेच नक्षल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.