
ब्रेकींग न्युज
मुल
सावली :- केरोडा
विज पडुन एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी ।
दिनांक 14/8/24.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुल ( सावली) तालुक्यातील जाम केरोडा येथील दोन महिलांवर विज पडुन मुत्यु झाल्याची घटणा घडली आहे.
केरोडा हा गावातील महिला शेतात काम करीत असतांना अचानक अंगावर विज कोसळल्याने एक महिला जागीच ठार झाली
असुन एक महिला गंभीर जखमी झाली आहे. विज पडुन जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव चित्रकला सुधाकर भुरसे हि जागीच ठार झाली तर शालु भाष्कर भुरसे ही महिला गंभीर जखमी झाली आहे.
सदर हि घटणा राहुल भंडारे यांच्या शेताजवळ घडली आहे. हि घटणेची महिती मिळताच शेतकरी धावुन गेले व गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांना व प्रशासनाला माहिती देण्यात आली.
आज सकाळ पासूनच मेघ गडगडतच होते विजांचा कडकळाट सुरू झाल्याने शेतात काम करीत असतांना विज पडल्याने हि घटणा घडली असुन परीसरात व गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटणेमुळे गावात शोककळा पसरली आहे.