Breaking
देश-विदेशब्रेकिंग

पोलीस नक्षल चकमकीत सहा नक्षली ठार तर अनेक नक्षली जखमी झाल्याची शक्यता

मुख्य संपादक

 

पोलीस नक्षल चकमकीत सहा नक्षली ठार तर अनेक नक्षली जखमी झाल्याची शक्यता

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

बीजापूर:-

दि. 27/3/2024.

बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस स्टेशन हद्दीतील चिप्पूरभट्टी परिसरात तालपेरु नदीजवळ सकाळच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत सहा (6) नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत असून त्यात दोन महिला नक्षलीसह डेप्युटी कमांडरचा सहभाग आहे. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाले होते. दरम्यान बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकुरभट्टी आणि पुसाबका गावांच्या जंगलात चकमक झाली. या कारवाईमध्ये डीआरजी, सीआरपीएफ 229, कोब्रा टीमचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, चकमकीनंतर घटनास्थळावरून दोन महिला व चार पुरुष नक्षल्यांचे मृतदेह सापडले आहेत. ठार झालेल्या नक्षल्यांवर लाखो रुपयांचे बक्षीस होते. तर या चकमकीत अनेक नक्षली जखमी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान घटनास्थळाची झडती घेतली असता सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू जप्त केल्या आहेत. अद्यापही जवान परिसरात शोध घेत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे