सॅल्यूट ! 16 वर्षी लग्न 2 मुलांसह सासर सोडले; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून ‘ती’ झाली IAS |
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम
सॅल्यूट ! 16 वर्षी लग्न 2 मुलांसह सासर सोडले; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून ‘ती’ झाली IAS …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक संतोष मेश्राम
दिनांक 29/11/2024.
मघ्यप्रदेश ,
मध्य प्रदेशातील मंडई गावातील सविता प्रधान यांचं जीवन हे सुरुवातीपासूनच आव्हानांनी भरलेलं होतं. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही, त्यांनी शिष्यवृत्तीच्या मदतीने दहावी पूर्ण केली. सविता या डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होत्या, पण शालेय शिक्षण पूर्ण होताच त्यांचं लग्न एका श्रीमंत कुटुंबामध्ये ठरलं. कौटुंबिक दबावाखाली वयाच्या १६ व्या वर्षी लग्न केलं. लग्नानंतर त्यांचं आयुष्य हे आणखी कठीण झालं.
कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून सविता यांनी आत्महत्येचा विचार केला, पण मुलांकडे पाहून त्या थोड्या खंबीर झाल्या. केवळ २७०० रुपये घेऊन त्यांनी आपल्या दोन मुलांसह सासरचं घर सोडलं. आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी ब्युटी पार्लर सुरू केलं आणि आपलं शिक्षण सुरू ठेवलं. शिक्षण घेत असतानाच त्यांनी राज्य नागरी सेवा परीक्षेबद्दल ऐकलं आणि ती परीक्षा क्रॅक करण्याचा निर्णय घेताल. कठोर परिश्रम आणि जिद्दीने त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली.
सविता आयएएस अधिकारी बनल्या आणि आज ग्वाल्हेर आणि चंबळ प्रदेशाच्या अर्बन एडमिनिस्ट्रेशनच्या जॉईंट डायरेक्टर आहेत. सविता यांनी आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट देऊन दुसरं लग्न केलं. त्यांनी ‘हिम्मत वाली लडकियां’ नावाचे YouTube चॅनल सुरू केलं, जिथे त्या महिलांना प्रेरित करतात.