आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भर कोर्टात केलं ‘ प्रपोज ; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
मुख्य संपादक

आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भर कोर्टात केलं ‘ प्रपोज ; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग…
मुंबई,
गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते. न्यायालये हे काम चोखपणे पार पाडतात. त्यामुळे लोकांचा अजूनही न्यायदेवतेवर विश्वास आहे. गुन्ह्यांमध्येही बलात्काराचा गुन्हा असलेल्या आरोपीला थेट फासावर चढवा, असा जनक्षोभही अनेकदा पाहायला मिळतो. पण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात काहीसे वेगळे घडले. बलात्काराच्या एका दोषीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली.
याचे कारण असे की, गुन्हेगार आणि पीडितेने एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायमूर्तींनी आरोपी तरूणाला पिडित तरूणीला कोर्टरूममध्ये प्रपोज करायला सांगितले. याबाबत न्यायमूर्तींनी सांगितले की, आम्ही दोघांनाही लंच टाइममध्ये भेटलो. त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.