राजुरा बसस्थानकाचे पत्रे जिर्न अवस्थेत; प्रवाशांच्या जिवितास धोका एस.टि.महामंडळाचे याकडे दुर्लक्ष
उपसंपादक :-/ स्वप्नील मेश्राम
राजुरा बसस्थानकाचे पत्रे जिर्न अवस्थेत; प्रवाशांच्या जिवितास धोका
एस.टि.महामंडळाचे याकडे दुर्लक्ष
चंद्रपूर :-/ राजुरा
राजुरा – गेल्या काही कित्येक दिवसापासून राजुरा बसस्थानकावरील वर टाकलेले एडवेस्टर (पत्रे) जीर्ण अवस्थेत पडलेले असुन काही पत्रे वादळ वाऱ्याने उडाले असुन या बस स्थानकावरून हजारो प्रवाशी प्रवास करीत असतात परंतु त्यांच्या जीवितास धोका व जीवितहानी होण्यास नाकारता येत नाही.
कित्येक प्रवासी बसस्थानकात बसुन असतात परंतु प्रवाशांना उनाचे चटके खावे लागतात तसेच लावून असलेले पंखे बंद असुन प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे व छतावरील जीर्ण अवस्थेत असलेले पत्रे प्रवाशांच्या जीवितास धोका दर्शवितात त्यामुळे बस स्थानक प्रमुख तसेच राजुरा बसस्थानकाचे व्यवस्थापक व एस. टि.महा मंडळाचे याकडे दुर्लक्ष दिसुन येत आहे.
तरी अनेक प्रवाशी एस. टी. महा मंडळावर नाराजगी व्यक्त करीत आहेत.