
सोशल मीडियामुळे देशात वाढतायेत घटस्फोट !
महाराष्ट्र ,
सोशल मीडियाच्या प्रभावामुळे नातेसंबंधांवर खूप विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पती-पत्नीमध्ये घटस्फोट होण्याच्या घटना तीन पटींनी वाढल्याचे चिंताजनक वास्तव एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.महत्वाचे म्हणजे, घटस्फोट घेणाऱ्यांचे देशात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याचे धक्कादायक वास्तव देखील या अहवालातून पुढे आले आहे.
‘एडजुआ लीगल्स गुगल ॲनालिटिक २०२५’च्या अहवालानुसार दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनौ, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अलीकडील वर्षांत घटस्फोटाच्या अर्जांची संख्या तीन पटीने वाढली आहे. ‘कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
Divorce