नागपुर येथे इंटास फाउंडेशन द्वारे हिमोफीलिया रुग्णांना नि:शुल्क फिजिओथेरपी शिबीर व फॅक्टर 9 चे वाटप.
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम
नागपुर येथे इंटास फाउंडेशन द्वारे हिमोफीलिया रुग्णांना नि:शुल्क फिजिओथेरपी शिबीर व फॅक्टर 9 चे वाटप.
लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी नागपुर .
नागपुर :-
इंटास फाउंडेशन आणि हिमोफिलिया सोसायटी नागपूर चॅप्टर च्या सहयोगाने लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी येथे हिमोफिलिया रुग्णांना निशुल्क फॅक्टर 9 चे वितरण आणि फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच त्या 21 हिमोफिलिया रुग्णांना फॅक्टर 9 चे वाटप केले. फिजिओथेरपीस्ट डॉ. अभिनव फडणीस यांनी रुग्ण व त्यांच्या पालकांना व्यायामाचे महत्व पटवून दिले. आणि व्यायाम कसा करायचा याचे प्रत्यश्चिक करून दाखवले. प्रस्तुत शिबिरामध्ये हिमोफिलिया सोसायटी नागपूर चॅप्टरच्या सेक्रेटरी डॉ. अंजु कडू, लता मंगेशकर हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रीटेंडन्ट डॉ. हर्ष देशमुख, तर इंटास फॉउंडेशन नागपूरचे प्रोजेक्ट असोसिएट श्री. निखिल वैद्य, एच-प्याप कॉर्डिंनेटर श्री.कालिदास वडमे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. इंटास फाउंडेशनचे मुख्यकार्यालय अहमदाबाद गुजरातला असून अपना घर, ब्लड फॉर लाईफ, इमेरजिनग इनिसिटिव्हज यासारख्या प्रकल्पावर 28 राज्यातील 80 पेक्षा जास्त जिल्ह्यात इंटास फाउंडेशनचे कार्य सुरू आहे.