
चक्क ! पतीनेच केली पत्नीची चाकू भोसकून निर्गुण हत्या।
गोंडपिंपरी तालुक्यातील थरारक घटना !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 12/09/2024.
चंद्रपूर,
गोंडपिपरी :- तालुक्यातील कोठारी वरून काही अंतरावर असलेल्या कुडेसावली या गावात आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 ला सकाळच्या सुमारास पतीने पत्नीला चाकू भोसकून निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतक पत्नी नामे वंदना धनपाल रामटेके वय ५५ वर्षे रा.कुडेसावली पो. तोहोगाव ता. गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथील असून पत्नीची चाकू भोसकून निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव नामे धनपाल रामटेके वय ६० वर्षे रा. कुडेसावली येथे एकत्र कुटुंबात राहत होते. आज सकाळच्या सुमारास पत्नी घरातील भांडी बाहेर काढून घासत असताना अचानक आरोपी धनपाल रामटेके हा घरी कोणीही नसल्याचे पाहून भांडी घासत असणाऱ्या पत्नीवर पाठीमागून धारदार शस्त्राने पाठीमागून वार केल्याने पत्नी ही गंभीर जखमी झाली व ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत जीव वाचवण्याकरिता धावपळ करताना पुन्हा समोरून चाकूने पोटावर वार करून पोटात चाकू भोसकून पोटातील संपूर्ण अवयव बाहेर निघेपर्यंत पोटात चाकू भोसकत होता व महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केल्याने घराशेजारील व गावातील लोकांनी धावत घटनास्थळी आले असता त्या महिलेचे संपूर्ण शरीर रक्त बंबाट झालेले होते व तसेच त्या महिलेला वाचविण्यासाठी लोकांनी प्रयत्न केला असता उलट त्या महिलेच्या पतीने त्याच्या हातात शस्त्र असल्याने लोकांवर शस्त्र दाखवून जिवंत मारण्याची धमकी देत होता.
त्यामुळे नाईलाजास्तव त्याच ठिकाणी उभे राहून संपूर्ण घटना लोकांनी उघड्या डोळ्यांनी घटना बघत होते त्यानंतर तेथील पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन कोठारी यांना माहिती दिल्याने घटनास्थळी ताबडतोब पोलीस दाखल झाले व आरोपीला ताब्यात घेऊन गंभीर जखमी व रक्तबंबाळ झालेल्या महिलेचा अखेर श्वास थांबून होता ताबडतोब रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी तिचा मृत्युदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच परिवारात एक मुलगी (विवाहित) दोन मुले, एक मुलगा चंद्रपूर येथे नोकरीवर आहे तर दुसरा मुलगा खाजगी वाहन चालक आहे. वाहन चालक मुलगा सकाळच्या सुमारास बाहेर गेल्याची संधी साधून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. तसेच पुढील तपास कोठारी पोलीस करीत आहेत. सदर या घटनेमुळे कुडेसावली या गावात शोककळा पसरली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी असे परिसरातील लोकांकडून बोलले जात आहे.