तहसील कार्यालयमध्ये बिनानियुक्त बिनपगारी कामगारांची फौज सज्ज !
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

तहसील कार्यालयमध्ये बिनानियुक्त बिनपगारी कामगारांची फौज सज्ज !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
कार्यकारी संपादक
गडचिरोली.
जिल्हा प्रतिनिधी
दिनांक :- 17/09/2024.
गडचिरोली येथील तहसील कार्यालयामधे गेली दहा ते पंधरा वर्षापासून अनेक विभागात दडी मारून बसलेले बिननियुक्त मोगरकर , इगडे,अंबादे,खोब्रागडे सारखे असे किती तरी बिन पगारी आजही मोठ्या दिमाखाने बाबुचे काम करतांना दिसत असून यांचेकडे आर्थिक व्यवहाराचे अतिशय महत्वपूर्ण टेबलांची जबाबदारी सबंधित अधिकाऱ्यांनी सोपवली असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
बिनपगारी कामगारांची ही फोज तहसील कार्यालयामध्ये भरती करताना,सबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकरी यांचें नियुक्तीची परवानगी न घेता.आपल्या मनमर्जीने भरती करून आपला आर्थिक लाभ घेतला गेल्याचे सांगितले जात आहे. यांच्या मनमर्जी नियुक्तीची तहसील कार्यालयीन परिसरात जो तो खमंग चर्चा करतांना दिसत आहे.
गडचिरोली तहसील कार्यालयामध्ये नव्यानेच रुजू झालेले,तहसीलदार या बिन पगारी कामगारांच्या फौजेची चौ कशी करून कारवाही करण्याचे धाडस दाखवीतील काय?
तसेच तहसील कार्यालयापुढें अनेक वर्षापासून मांडी ठोकून बसलेले. स्टॅम्प व्हेंडर 90 रुपयांना भेटत असलेला स्ट्यांप आज ११0 रुपयांना विकुन ग्राहकांची लूट करून अमाप पैसे कमवून मालामाल झाल्याची ग्राहकांमध्ये चर्चा असून.यांनी विकत आसलेल्या स्टॅम्प पेपर च्या चौकशीची मागणी ग्राहकांनी सुध्दा केलेली आहे.