
थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरीने जिंकला मिस वर्ल्ड 2025 चा किताब
थायलंड,
दि.1/06/25.
‘मिस वर्ल्ड २०२५ या स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिनं मिस वर्ल्ड २०२५’चा मुकुट जिंकला. जगभरातील स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. भारताची नंदिनी गुप्ता टॉप ८ मधून बाहेर पडली. सुचाता चुआंगसरी हिचा जन्म २० सप्टेंबर २००३ रोजी थायलंडमध्ये झाला. ती थाई मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धेची विजेती देखील आहे. मिस वर्ल्ड बनणारी ती पहिली थाई महिला आहे, तिने तिच्या देशासाठी हा मुकुट जिंकला. यापूर्वी ती ‘मिस युनिव्हर्स थायलंड २०२४’ देखील राहिली आहे.