आरोग्य व शिक्षण
वेळीच सावध व्हा ! कोरोना हळूहळू टेन्शन वाढवतोय ; 5 दिवसात 1700 रुग्णाची नोंद 7 जणांचा मृत्यू…
मुख्य संपादक

वेळीच सावध व्हा ! कोरोना हळूहळू टेन्शन वाढवतोय ; 5 दिवसात 1700 रुग्णाची नोंद 7 जणांचा मृत्यू…
दि 01/06/25.
देशात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. गेल्या 5 दिवसांत कोविडचे 1700 रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णांची संख्या 2700 च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 30 मे पर्यंत देशभरात 2710 रुग्णांची नोंद झाली आहे. या आधीच्या आठवड्यात 752 रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांची संख्या सातत्याने वेगाने वाढत आहे.