आरोग्य व शिक्षण
धक्कादायक! ज्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घ्यायचा तिथेच उपचार मिळाले नाहीत; विद्यार्थ्यांचा मृत्यू
मुख्य संपादक संतोष मेश्राम

धक्कादायक! ज्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घ्यायचा तिथेच उपचार मिळाले नाहीत; विद्यार्थ्यांचा मृत्यू
दिनांंक 12/4/25.
बिहार ,
बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच कॉलेजमध्ये उपचाराविना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.
या विद्यार्थ्याचे नाव अभिनव पांडे आहे. तो पटना येथील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. ७ एप्रिल रोजी अभिनव पांडे पटना येथील हट्टाली मोरजवळ एका रस्ते अपघातात बळी पडले. त्याला आधी जखमी अवस्थेत आयजीआयएमएसमध्ये दाखल करण्यात आले.