ब्रेकिंग
आम्हा महिलांना एक खून माफ करा , महिला दिनी रोहिणी खडसेची खळबळजनक मागणी
मुख्य संपादक संतोष मेश्राम

आम्हा महिलांना एक खून माफ करा , महिला दिनी रोहिणी खडसेची खळबळजनक मागणी
दिनांक 8/03/2025.
मुंबई,
महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सत्ताधारी भाजपच्या खासदाराच्या मुलीची छेड काढण्यात आली होती. यानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. शुक्रवारी शिवशाहीमध्ये एका तरुणीची छेड काढण्यात आली होती. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. यामुळे शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आम्हा महिलांना एक खून माफ करा, अशी मागणी महिला दिनादिवशीच केली आहे.