क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमुंबई
शंभरीच्या आत इंग्लडचा खेळ खल्लास ! मुंबईचं मैदान मारत टिम इंडियानं ४-१ असा ‘वसुल’ केला ‘लगान ‘
मुख्य उपसंपादक :-स्वप्नील मेश्राम .

शंभरीच्या आत इंग्लडचा खेळ खल्लास ! मुंबईचं मैदान मारत टिम इंडियानं ४-१ असा ‘वसुल’ केला ‘लगान ‘
दिनांक 3/2/25.
मुंबई ,
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडला शंभरीच्या आत ऑल आउट करत मोठ्या विजयाची नोंद केली. पाहुण्या इंग्लंड संघाला १५० धावांनी पराभूत करत भारतीय संघानं पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी आपल्या नावे केली. अभिषेक शर्माच्या विक्रमी १३५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघानं इंग्लंडसमोर २४८ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या ९७ धावांत ऑलआउट झाला. इंग्लंडची पहिली विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीनंच इंग्लंडचा खेळ शंभरीच्या आत खल्लास केला. ही टीम इंडियासाठी आणखी एक आनंदाची गोष्ट ठरली