
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मुत्युदेह ; परीसरात खळबळ !
मुंबई ,
मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील मंकी हिल परिसरात रेल्वे रुळाजवळ एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. याबाबात माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.