भाजप आमदार श्वेता महालेच्या बाडीगार्ड ची आत्महत्या बुलढाण्यात खळबळ…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 31/7/24.
बुलढाणा
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचा बॉडीगार्ड अजय शंकर गिरी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्या. यानंतर त्यांना उपचारासाठी स्थानिय जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ सूत्रांनी याची पुष्टी केली आहे.