
बापरे ! पुण्यातील थर्टी फस्टँच्या पार्टीसाठी पबने वाटले कंडोम आणि ORS प्रकरण पोहचले पोलीसांपर्यत ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 30/12/2024.
पुणे ,
सगळीकडे नव्या वर्षाचा उत्साह दिसत आहे. जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागताचे बेत ठरू लागले आहेत. पुण्यातही एका पबने थर्टी फर्स्ट निमित्त पार्टी आयोजित केली आहे. पण, ही पार्टी वेगळ्याच मुद्द्यामुळे चर्चेत आली आहे. या पार्टीमध्ये पबकडून कंडोम आणि ओआरएस पाकिटे दिली जाणार आहेत. यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आक्षेप घेतला असून, प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचलं आहे.