
ट्रक मागे घेतांना चाकाखाली चिरडून तरुणाचा मुत्यु ,लोणी काळभोरमधील रामाकृषी कंपनीतील घटणा
पुणे : ट्रक मागे घेताना चाकाखाली चिरडून तरुण कामगार ठार झाला आहे. हा अपघात १७ मार्च रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास लोणी काळभोरमधील रामाकृषी कंपनीत घडला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भैरवनाथ गोवर्धन काकडे (३१ रा. बोरीभडक, दौंड ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील काकडे (३६ रा. चंदनवाडी, दौंड ) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.