आरोग्य व शिक्षणपुणे
दिनानाथ रुग्णालयाचा आणखी एक कारनामा ; महानगर पालिकेचा 27 कोटिंचा मिळकतवर थकवला
मुख्य संपादक

दिनानाथ रुग्णालयाचा आणखी एक कारनामा ; महानगर पालिकेचा 27 कोटिंचा मिळकतवर थकवला
पुणे ,
दिनांक 5/4/2025.
पुणे गर्भवती महिलेचा बळी घेणाऱ्या दीनानाथ रुग्णालयाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालय चालविणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने २०१९-२० पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा कर थकवला आहे.