आरोग्य व शिक्षण
कौतुकास्पद ! सहावीत नापास पण पहिल्याच प्रयत्नात UPSC पास ; अपयशाने खचून न जाता झाली IAS
मुख्य संपादक

कौतुकास्पद ! सहावीत नापास पण पहिल्याच प्रयत्नात UPSC पास ; अपयशाने खचून न जाता झाली IAS
मुंबई,
रुक्मिणी रेयर
मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. आयएएस रुक्मिणी रेयर या सहावीत नापास झाल्या होत्या पण नंतर पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. जर एखादी व्यक्ती शाळेत नापास झाली असेल तर त्याचा अर्थ असा नाही की, ती व्यक्ती आयुष्यातही नापास होईल. हेच रुक्मिणी यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.