आरोग्य व शिक्षण
दहावी आणि बारावीत नापास झालेली मुलगी पहिल्याच प्रयत्नात झाली IAS, डॉ. अंजु शर्माचा प्रेरणादायी प्रवास
मुख्य संपादक

दहावी आणि बारावीत नापास झालेली मुलगी पहिल्याच प्रयत्नात झाली IAS, डॉ. अंजु शर्माचा प्रेरणादायी प्रवास
मुंबई ,
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणं खूप कठीण आहे असं अनेकदा म्हटलं जातं. काही सामान्य विद्यार्थी असे आहेत जे सुरुवातीला शिक्षण घेताना नापास झाले परंतु नंतर त्यांच्या चुकांमधून शिकत मोठं यश मिळवलं आहे. आयएएस डॉ. अंजू शर्मा यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत त्या नापास झाल्या होत्या. पण कठोर परिश्रम आणि समर्पणाने त्या पहिल्याच प्रयत्नात UPSC पास झाल्या आहेत.