ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत मारून दिला हातपंप….
मुख्य-उपसंपादक
स्वप्निल मेश्राम ✍️✍️..
गडचिरोली
चामोर्शी :- तालुक्यातील वायगाव ( चांदेश्वर ) ग्रामपंचायतीने आज (दि. ५ जुलै) चांदेश्वर स्मशानभूमीत मारून दिला हातपंप.गेल्या कित्येक वर्षापासून स्मशानभूमी अभावी नागरिकांचे होत होते हाल, अंतिम संस्काराकरिता नाल्याच्या काठावर तसेच आपआपल्या शेतात सुध्दा अनेकदा अंतिम संस्कार करावा लागत होता परंतु आता या सर्व अडचणी चांदेश्वर वासीय नागरिकांचा काही महिन्यापूर्वी प्रश्न सुटला असुन तसेच स्मशानभूमीत ग्रामपंचयतीकडून आज हातपंप मारण्यात आला.
नागरिकांत समाधानाचे वातावरण.