
लोकशाहीचा शिमगा ( कविता )कवी लेखक :- प्रभाकर दुर्गे
गडचिरोली ,
मुलचेरा :- तालुक्यातील अडपल्ली चक या छोट्याशा गावात वास्तव्य करीत असलेले कवी प्रभाकर दुर्गे , असुन लेखनाची आवड व जिद्दीने बनला कवी ,लेखक प्रभाकर दुर्गे तसेच त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित व अनेक पुरस्कार मिळाले असुन सर्व त्र चर्चा सुरू आहे.त्यांची ही कविता प्रकाशीत . ..
शिर्षक – लोकशाहीचा शिमगा
काय चाललंय इथल्या राजकारणी
वेळोवेळी खंत होई मज मनोमनी
दिन विचारांनी जाई अशी मनमानी
कशी सांगू माझ्या राज्याची परवानी
राज्याचा विकास गेला वाऱ्यावर उडत
मध्येच इथे बातमी येते सनसनी
सत्तेसाठी बदलतात नेहमी बाप
हे सर्व नेते एकाच माळीचे मणी
एकीकडे समृद्धीचा दुर्दैवी अपघात
तर दुसरीकडे दोगले नेते विसरून पक्षपात
सुट्टीच्या दिवशी एकत्र येऊनी सर्व
शपथविधी घेत होते राजभवनात
कालपर्यंतचे एकमेकांचे कट्टर वैरी
बनुन मित्र, हाती घेऊन राज्याचं सूत्र
आज चिंधळ्या उडवल्या लोकशाहीच्या
नेहमीप्रमाणे समजून जनतेला कुत्र
तिथं बुलढाणा जिल्ह्यात अपघातात
मरणारे पंचवीस लोक सरणावर जळत होते
आणि इथं महाराष्ट्राचे दोगले नेते मिळुनी
राजभवनात लोकशाहीचा शिमगा खेळत होते
पाहुनी राजकारण विचार येतो मनी
काय बोध घ्यावा अन काय नाही
नावापुरती इथे जनतेच्या हाती सत्ता
महाराष्ट्र माझा संवेदनशील राहिला नाही
मतदारांनो आतातरी होऊनी तुम्ही जागृत
एकतेने द्या त्यांच्या बुद्धिबळावर भत्ता
त्याशिवाय हे ऐकणार नाहीत कधीचं
आणि नाही देणार कधी जनतेच्या हाती सत्ता
*कवी, लेखक : प्रभाकर देविदास दुर्गे*
अडपल्ली चक ( गडचिरोली