Breaking
क्रिडा व मनोरंजनगडचिरोली

प्राध्यापकांच्या कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणारे गोंडवाना हे एकमेव विद्यापीठ -प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे ! गोंडवाना विद्यापीठात रंगलाय दोन दिवसीय शिक्षक क्रीडा व कला महोत्सव, शिक्षकांमधील कलागुणांचे सादरीकरण.

मुख्य संपादक

 

 

प्राध्यापकांच्या कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणारे गोंडवाना हे एकमेव विद्यापीठ -प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे

गोंडवाना विद्यापीठात रंगलाय दोन दिवसीय शिक्षक क्रीडा व कला महोत्सव, शिक्षकांमधील कलागुणांचे सादरीकरण.

गडचिरोली 

दिनांक 21/03/2024.

विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयस्तरावर तसेच विद्यापीठ स्तरावर विविध शैक्षणिक कार्यक्रम व नाविण्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केल्या जाते. मात्र, प्राध्यापकांच्या कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणारे गोंडवाना हे एकमेव विद्यापीठ असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी केले.

 

 

 

गोंडवाना विद्यापीठाद्वारे शिक्षक क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन 19 ते 20 मार्च 2024 या दोन दिवसीय कालावधीत करण्यात आले होते. सदर महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विवेक गोर्लावार, रामदासजी कामडी, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे, परीक्षक म्हणून मारोतराव इचोडकर, तुलाराम राऊत, मनीषा मडावी तसेच विविध विभागाचे प्राध्यापक आदी उपस्थित होते.

 

 

 

पुढे बोलतांना प्र-कुलगुरु डॉ. कावळे म्हणाले, विद्यापीठाच्या वतीने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील संलग्नीत महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य व प्राध्यापकांनी या कला व क्रीडा महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यापीठात नुकतेच झाडीबोली व युवा साहित्य संमेलन घेण्यात आले. महाविद्यालयस्तरावर अशा प्रकारच्या कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र, विद्यापीठांमध्ये प्राचार्य व प्राध्यापकांकरीता कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणारे गोंडवाना हे एकमेव विद्यापीठ असल्याचे ते म्हणाले.

 

 

 

या महोत्सवाच्या माध्यमातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्राध्यापक एकत्र आलेत. मोठ्या उत्साहाने कला व क्रीडा प्रकारात सहभाग नोंदविला. याबद्दल सहभागी सर्व प्राध्यापकांचे त्यांनी कौतुक केले.

 

 

 

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विवेक गोर्लावार म्हणाले, विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या कुशल नेतृत्वातून प्राध्यापक वर्गांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 30 ते 35 महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला, ही अभिमानाची बाब आहे. क्रीडा व कला स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहे. भविष्यातही अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल. त्यामध्ये देखील महाविद्यालयांचा सहभाग वाढेल.

 

 

 

 

 

प्रस्ताविकेत बोलतांना डॉ. अनिता लोखंडे म्हणाल्या, कलादर्पण-2024 हा शिक्षकांसाठी आयोजित केलेला शिक्षक क्रीडा व कला महोत्सव आहे. गतवर्षी देखील या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावर्षी देखील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्राध्यापक मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत. प्राध्यापकांना विविध परीक्षा विषयक कामे असतात. कामातील ताण कमी व त्यातून विरगुंळा मिळावा यासाठी अशा महोत्सवाचे आयोजन करणे महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.

या शिक्षक क्रीडा व कला महोत्सवांमध्ये खेळ प्रकारात क्रिकेट, बॅडमिंटन व्हॉलीबॉल आणि बुद्धिबळ तर कला प्रकारात एकल गीत गायन, समूहगीत गायन, एकलनृत्य, समूहनृत्य आदींचा समावेश होता.

 

 

 

 

 

कला व क्रीडा प्रकारात सहभागी प्राध्यापकांना बक्षीस वितरण:

क्रिकेट(पुरुष) गटात प्रथम क्रमांक जे.एस.पी.एम. महाविद्यालय धानोरा, द्वितीय क्रमांक गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपूर, व्हॉलीबॉल खेळ प्रकारात प्रथम क्रमांक सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, द्वितीय क्रमांक जे.एस.पी.एम. महाविद्यालय धानोरा, बॅडमिंटन डबल्स (पुरुष) गटात प्रथम क्रमांक गो. मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा येथील प्रा. गणेश सातपुते व प्रा. प्रमेश दाणी, द्वितीय क्रमांक ने.हि.महाविद्यालय ब्रह्मपुरी येथील डॉ. योगेश ठावरी व प्रा. जयेश हजारे तर उत्कृष्ट खेळाडूमध्ये जे.एस.पी.एम. महाविद्यालय धानोराचे प्रा. प्रशांत वाळके, प्रा. स्वप्निल बलोडे तर ने.हि.महाविद्यालय ब्रह्मपुरी येथील प्रा.धीरज आतला व प्राध्यापक रुपेश वाकोडीकर तसेच बॅडमिंटन डबल्स (महिला) गटात प्रथम क्रमांक सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील डॉ. वैशाली थुल व डॉ. शरयू पोटमरवार तर द्वितीय क्रमांक ने.हि.महाविद्यालय ब्रह्मपुरी येथील डॉ. कुलजित कौर गिल, व प्रा. नीलिमा रंगारी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

एकल गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक गोंडवाना विद्यापीठाच्या डॉ.स्नेहा वनकर, द्वितीय क्रमांक डॉ. प्रशांत ठाकरे, समूहगीत गायन स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. राजलक्ष्मी कुलकर्णी व संघ तर द्वितीय क्रमांक लोकमान्य महाविद्यालय वरोराच्या प्रा. जयश्री शास्त्री व संघ, एकलनृत्य स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या डॉ.पद्मरेखा धनकर तर द्वितीय क्रमांक डॉ. उषा खंडाळे, समूहनृत्य स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालयाच्या डॉ. रंजना लाड व संघ तर द्वितीय क्रमांक डॉ.पद्मरेखा धनकर व संघ, तसेच लघुनाटिका स्पर्धेत निलकंठराव शिंदे महाविद्यालय, भद्रावती येथील डॉ. अपर्णा धोटे व संघ तर द्वितीय क्रमांक विदर्भ महाविद्यालय जिवती येथील प्रा. अमित बोरकर व संघ यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

 

 

 

सदर महोत्सवाच्या यशस्वीतेकरीता प्रा.अमोल चव्हाण, सतीश पडोळे, स्नेहा वनकर, प्रा.रोहित कांबळे, डॉ. निलकंठ नरवडे, डॉ. संजय डाफ, कल्याणी गेडाम आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विकास पुनसे यांनी केले तर आभार डॉ. हेमराज निखाडे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे