
राहत्या घरी गळफास घेऊन संपविली जिवनयात्रा….
गडचिरोली ,
चामोशीँ / लक्ष्मणपुर
लक्ष्मणपूर येथे एका इसमाने केली गळफास घेऊन आत्महत्या
आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील लक्ष्मणपूर येथे एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि ३ एप्रिल ला सकाळी उघडकीस आली आहे.
मृतकाचे नाव रमेश गजानन चनेकार वय ५२ वर्षे रा.लक्ष्मणपूर असे असून ते काल दि २ एप्रिल चे रात्री ११.३० ते पहाटे ५.०० वाजताच्या दरम्यान घराच्या बाजूला असलेल्या टिनाच्या मांडवाच्या फाट्याला दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. सकाळी जेव्हा घरातील कुटुंब जागे झाले तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले तेव्हा सुधीर बंडू चनेकार वय २९ वर्ष रा.लक्ष्मणपूर यांनी आष्टी पोलीस स्टेशन ला माहीती दिली त्यावरुन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा भाऊराव वनकर करीत आहेत.