
अहेरी येथील वस्तीगृहात विद्यार्थ्यांना बेद्दम मारहाण, अधीक्षक व मुख्याध्यापक यांचेवर कारवाई करण्याची मागणी …
अहेरी,
दि..28/3/25.
अहेरी येथील वस्तीगृहात विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, अधीक्षक व मुख्याध्यापक यांचेवर कारवाई करण्याची मागणी..
अहेरी (गडचिरोली): एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, अहेरीच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांवर अमानुष छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतिगृह अधीक्षक ईश्वर नारायण शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना मारहाण, मानसिक छळ आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केले आहेत. या संदर्भात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार अर्ज दाखल केला असून अधीक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण मुख्याध्यापकांनी कोणतीही कारवाई केली नाही. या षडयंत्र दाबण्याचे प्रयत्न चालू आहे.
विद्यार्थ्यांचे गंभीर आरोपः
नववीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणः
सकाळी ५ वाजता झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांना बांबूच्या काठीने तंगडीवर जबरदस्त मारहाण करण्यात आली.
बारावीच्या विद्यार्थ्यांना मानसिक छळ आणि धमकीः
अधीक्षकाने विद्यार्थ्यांना वारंवार धमक्या देत मानसिक दबाव टाकला.
अमन कुलसंगे याला बेदम मारहाणः
७ मार्च २०२५, रात्री ११:१५ वाजता तब्येत खराब असलेल्या अमन कुलसंगे याला स्वतःच्या चप्पलने आणि काठीने तंगडीवर ४० वेळ बेदम मारहाण करण्यात आली.
सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांवर कठोर शिक्षाः
रात्री १० नंतर पाढे विचारले जातात, चुकल्यास ४० वेळा हातावर मारले जाते.
विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरणः
सततच्या छळामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आले असून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
पुरावे स्पष्ट – अमानुष छळाचे प्रत्यक्ष चित्रण
विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचे प्रत्यक्ष छायाचित्र उपलब्ध असून, त्यांच्या पायावर खोल जखमा झालेल्या स्पष्ट दिसत आहेत.
आदिवासी विभागाला इशारा – तात्काळ कारवाई करा !
या अमानुष वर्तनाविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, महाराष्ट्र यांनी कठोर भूमिका घेतली आहे. प्रदेश सचिव अॅड. राकेश तोरे आणि गिरीश जोगे, चंद्रकांत वेलादी (सामाजिक कार्यकर्ता) यांनी अधीक्षक ईश्वर शेवाळे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
जर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद आणि समाज बांधव विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.