ब्रेंकिग
दि.25 जाने. 2023.
आणखी सुषमा सचिन राऊत हीचे मिळाले प्रेत , सचिनच्या पत्नी व आईचंएकाच वेळी निधन कसं सांभाळणार चिमुकल्यांना..
आता सचिन कसे सांभाळणार दिड वर्ष व नऊ महिन्याच्या चिमुकल्यांना
आई व आजीचे सुद्धा एकाच वेळी निधन .
गडचिरोली
चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील सात महीला मिर्ची तोडण्यासाठी शेजारी चंद्रपूर जिल्ह्यातील गावात जाण्यासाठी दिनांक 23 जानेवारी मंगळवारी सकाळी वैनगंगा नदीतून नावेने जाण्यासाठी निघाल्या. मात्र नावेत क्षमतेपेक्षा जास्त जण झाल्याने नाव नदीत उलटली यात सहा महिलांना जलसमाधी मिळाली तर एका महिलेचा जीव वाचविण्यात यश आले. नावाडी मात्र सुखरूप बाहेर आला. या घटनेने गणपुर गावावर शोककळा पसरली असुन तिन महिलांचे मृतदेह हाती लागले असून तीन महिलांचा शोध घेणे सूरू आहे.
या दुर्दैवी घटनेत गणपुर येथिल राऊत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सासू मायाबाई राऊत वय 45 वर्ष सून सुषमा राऊत वय 25 वर्ष या दोघींचाही करुण अंत झाला. माया राउत या सुखरूप बचावल्या होत्या मात्र सुनेला वाचविण्यासाठी हात देत असतानाच पाण्याच्या प्रवाहात त्याही वाहून गेल्या. सचिन राऊत यांच्यावर आई आणि पत्नी यांच्या निधनानं दुहेरी संकट कोसळले असुन सुषमा हीला नऊ महिन्यांचा व दीड वर्षाचा अशी दोन मुल आहे. आता ही लहानगी मुले आजी आणि आईच्या प्रेमाला पोरखी झाली आहेत. या घटनेची माहिती कळताच सचिन हा सैरभर होवुन नदीच्या दिशेने सुसाट निघाला पण आई अणि पत्नीला वैनगंगेने आपल्या कुशीत घेतल्याने त्याच्या दुःखाला पारावार उरला नाही.
नदीकिनाऱ्यावरील शोकमग्न वातावरण पाहून उपस्थितांची मन गहिवरून आली होती. गाव शोकसागरात बुडाले तर नातेवाईकांनी गणपुरच्या दिशेने धाव घेतली. आतापर्यंत जिजाबाई राऊत, पुष्पा झाडे, आणि रेवांता झाडे या तीन महिलांचे मृतदेह हाती लागले अन्य तीन महिलांच्या शोधासाठी पोलिसांनी नावेच्या सहायाने शोधमोहीम युद्धपातळीवर राबवित असुन मृतकांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडल्याने सारे गाव शोकसागरात बुडाल्याचे चित्र होते.