
पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी ! मक्याच्या पिकात दाभा धरुन बसलेल्या वाघाने घेतला शेतकऱ्याचा बळी ,शेतकरी जागीच ठार..
चामोशीँ तालुक्यातील गणपुर येथील घटणा ,
दिनांक 2/3/2025.
मुख्य संपादक संतोष मेश्राम
गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील शेतकरी आपल्या शेतात मक्याचे उत्पन्न घेत असल्यामुळे तो दररोज शेताकडे जात होता अश्यातच दि. १ मार्च ला शेतात गेला असता मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या वाघाने गणपत भाऊजी राऊत वय ५० रा. गणपूर याला वाघाने झडप मारून जागीच ठार केले व त्यांचे पायाचे मास सुध्दा फस्त केले सदर वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली वनविभाग व पोलीस स्टेशन चामोर्शी यांना माहीती देण्यात आली. गणपत याचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठविण्यात आले. गणपत यांच्या मृत्युमुळे घरच्या मंडळीवर शोककळा पसरली असुन अधिक तपास सुरु आहे.