
बौद्धगया येथील महाबोधी महाविहारला मुक्तता द्या! ‘बौद्ध अस्मिता रक्षण समिती’ सर्कल येनापुर व बौद्ध समाज बांधवाची मागणी …
1949 चा ॲक्ट रद्द करा बौद्ध समाज बांधवांची मागणी…
उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांच्या मार्फत राष्ट्रपतीकडे निवेदन सोपविले ।
दिनांक 01/03/2025.
चामोर्शी येनापुर :- बौद्धगया येथील महाबोधी महाविहराला मुक्तता मिळावी आणि 1949 चा बोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी (बीटीएमसी) ॲक्ट रद्द करण्यात यावी अशी मागणी करून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे चामोर्शी उपविभागीय अधिकारी, यांच्या मार्फतीने बौद्ध अस्मिता रक्षण समिती येनापुर व बौद्ध समाज बांधवांनी आज दिनांक 28/02/2025 रोजी उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहारात बौद्ध भिक्षू संघांनी बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून, त्यासाठी बौद्ध अस्मिता रक्षण समितीचा पाठींबा आहे, देशात विविध धर्माचे धार्मिक स्थळे आहेत व सर्व धर्मियांचे आप-आपले स्वतःचे ताबा आहेत. जागतिक स्तरावरचे महाबोधी महाविहाराचे बौद्ध धर्मीयांकडे ताबा नसल्याने 1949 चा बिटीएमसी ॲक्ट रद्द करून (कारण त्यात चार बौद्ध तर पाच गैरबौद्ध आहेत) पूर्णपणे ताबा बौद्ध धर्मीयांकडे देऊन व्यवस्थापनाची जबाबदारी बौद्ध भिक्षुंकडे सोपविण्याची एकमुखी मागणी केली आहे.
महाबोधी महाविहाराला जागतिक स्तरावरचा इतिहास असून यूनोस्कोने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे रेंगाळत असलेले व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न निकाली काढून तात्काळ बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध धर्मीयांकडे देण्याची मागणीचे निवेदन चामोर्शी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भारताचे द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्याकडे सोपविण्यात आले असून तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनबौद्ध अस्मिता रहण समिती करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना’ बौद्ध अस्मिता रक्षण समितीचे अध्यक्ष मा.काजल मेश्राम , उपाध्यक्ष मा.राजेंद्र रामटेके ,सचिव मा. प्रितम घोनमोडे सचिव,मा. महासचिव सुनिल गोर्वधन, मा. प्रमोद उमरे संघटक ,मा. मंगलदास चापले (प्रवक्ता ) मा. आनंद गोडबोले प्रवक्ता , मा.अँन्ड. दिनेश राऊत सल्लागार ,मा. संतोष मेश्राम ,मा. परीजन दहिवले कोषाध्यक्ष , मा.संदेश देवतळे सहसचिव ,मा.गिरीधर उंदिरवाडे,मा.उत्तमचंद बारसागडे मा.पुरुषोत्तम उंदिरवाडे ,मा. अंकुश निमसरकार , मा. जितु झाडे ,मा. चंद्रशेखर पेटकर ,मा.रोशन गेडाम मा.मोरोती अवथरे सौ.शोभाताई कुरखेडे , सौ. रजनी बारसागडे ,सौ. अल्का रामटेके , सौ. योगीता रामटेके , आदी व असंख्य बौद्ध उपासक व उपासीका बांधव उपस्थित होते.