येणापूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाचे गडचिरोली जिल्हा अधिवेशन संपन्न
मुख्य संपादक संतोष मेश्राम

येणापूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाचे गडचिरोली जिल्हा अधिवेशन संपन्न
दिनांक 16/2/25.
गडचिरोली / येनापुर ,
येणापूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाचे गडचिरोली जिल्हा अधिवेशन संपन्न
गडचिरोली: विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाच्या वतीने आयोजित गडचिरोली जिल्हा अधिवेशन इंदिरा गांधी विद्यालय व उच्च महाविद्यालय, येणापूर येथे संपन्न झाले. या प्रसंगी आमदार रामदासजी मसराम सत्कारमूर्ती व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. आमदार रामदासजी मसराम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
त्या प्रसंगी आमदार सुधाकरजी अडबाले , सचिव,गोंडवाना शिक्षण प्रसारक मंडळ,येनापुर जयंतजी येलमुले, अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ अरविंद देशमुख,जिल्हा कार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ जिल्हा भंडारा,राजेश धुर्वे, सचिव,यंग टीचर्स असोसिएशन गोंडवाना विद्यापीठ डॉ. विवेक गोर्लावार, जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा गडचिरोली. गुरुदेव नवघडे, अध्यक्ष विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन गडचिरोली प्रा. विजय कुत्तरमारे, अध्यक्ष,अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना सतीश पवार, आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना प्रमुख प्रकल्प अहेरी, सुरेंद्र अडबाले कार्यवाह चंद्रपूर शहर.सुरेंद्र शेळके अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा,दीपक धोपटे, अजय लोंढे ,अजय वर्धरवार , रवींद्र नैताम, नरेंद्र भोयर, शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते.