आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
संतापजनक ! पाळी आलेल्या विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बसून लिहायला लावला पेपर, शाळेतील धक्कादायक घटना…
मुख्य संपादक

संतापजनक ! पाळी आलेल्या विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बसून लिहायला लावला पेपर, शाळेतील धक्कादायक घटना…
तामिळनाडू ,
दिनांक 10/4/25.
तामिळनाडूतील कोईंबतूर येथील एका शाळेमध्ये आठवीतील एका विद्यार्थिनीला पाळी आल्याने चक्क वर्गाबाहेर बसवून पेपर लिहायला लावल्याची घटना समोर आली आहे. कोईंबतूरमधील शाळेतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये आठवीतील एक विद्यार्थिनी वर्गाबाहेर बसून पेपर लिहिताना दिसत आहे. मात्र या विद्यार्थिनीला अन्य कुठल्या कारणासाठी नव्हे तर तिची मासिक पाळी आलेली असल्याने वर्गाबाहेर बसवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने गंभीर आरोप केले आहेत. सेंगुट्टई येथील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीच्या आईने तिचा व्हिडीओ तयार केला आहे.