
संतापजनक ! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारु ।
मध्यप्रदेश
दिनांक 21/4/25.
आई वडिलांनंतर मुलांना संस्कार देण्याचे आणि घडवण्याचे काम कोण करत असेल तर ते शिक्षक आहेत. परंतु, असे काही शिक्षक असतात, जे विद्यार्थ्यांना घडवण्याऐवजी बिघडवण्याचे काम करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एक शिक्षक विद्यार्थ्यांना दारूचा पॅग कसा बनवायचा हे शिकवून त्यांना दारु पाजताना दिसतोय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.हा प्रकार मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील आहे.