सार्वजनिक बांधकाम विभागातील विश्रामगृहात बादशाही जीवन जगतो कंत्राटी मजूर.
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

सार्वजनिक बांधकाम विभागातील विश्रामगृहात बादशाही जीवन जगतो कंत्राटी मजूर.
गडचिरोली.
अनुप मेश्राम.
सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 01.गडचिरोली
अंतर्गत येत असलेले इंदिरा गांधी चौकातील उभारलेले विश्रामगृह बाहेरील अतिथीच्या सोयी सुविधा साठी उपलब्ध केलेल्या विश्राम गृहावर एका रोजंदारी मजुरांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले असून, आज तो व त्याचे सम्पूर्ण कुटुंब विश्राम गृहात बादशाही जीवन जगताना दिसत आहेत.
विश्राम गृहावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणारा हा रोजनदारी मजूर, विश्रामगृहचा सम्पूर्ण ताबा व विश्राम गृहाच्या सम्पूर्ण च्याब्या स्वतःकडे ठेवून विश्रामगृहचा दूरउपयोग करताना रोजच दिसत असतो.
विश्रामगृहात विश्रांती साठी आलेल्या बाहेरील अतिथीना बसल्या खुर्चीवरूनच मार्गदर्शन करून विश्राम गृहच्या सम्पूर्ण रुमा आरक्षित असल्याचे सांगून आलेल्या अतिथीना आल्या पाऊलानी हुसकावून लावीत असतो.
बाहेरील रिकाम टेकड्याना विश्रामगृहाचे दरवाजे बसण्यासाठी नेहमीच उघडे करून त्यांच्या कडून शभर रुपये घेऊन आपले हात पिवडे करताना दिसतो.
विश्रामगृहात काम करणाऱ्या रोजनदारी मजुरावर शहरातील अनेक जाणकार लोकांनी नाराजी व्यक्त करून.विश्राम गृहातून यांची त्वरित हकालपट्टी करून रेगुलर खामसमाची नवं नियुक्तीची मागणी. सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव भोपये यांनीएका निवेदनातून केलेली आहे तसेच लाखो रुपये खर्चून विश्रामगृहची रंगरंगोटी. लहान मोठी मेन्टन्सची कामे करणाऱ्या ठेकेदार.व त्या कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्यांची सखोल चोकशीची मागणी सामाजिक नेते गुरुदेव भोपये यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.