
8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार 35 पदांवर करणार नविन नियुक्त्या ।
केंद्र सरकार,
दिनांक 21/4/25
केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. अर्थ मंत्रालयाने आयोगासाठी 35 पदे भरण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. यावरुन असे दिसून येते की, सरकार लवकरच वेतन आयोगाची रचना आणि कार्ये औपचारिकरित्या सुरू करू शकते. याचा फायदा देशभरातील 47.८५ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८.६२ लाख पेन्शनधारकांना होऊ शकतो.