महाराष्ट्र
महिलांसाठिच्या कॅन्सर व्हॅक्सीन संदर्भातमोठी अपडेट , सहा महिन्यात होणार उपलब्ध; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
मुख्य संपादक संतोष मेश्राम

महिलांसाठिच्या कॅन्सर व्हॅक्सीन संदर्भातमोठी अपडेट , सहा महिन्यात होणार उपलब्ध; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती।
दिनांक 19/2/25.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कॅन्सरच्या लसीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, महिलांना होणाऱ्या कॅन्सरसाठी एक लस पुढील पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार आहे. ही लस ९ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाईल. देशात कॅन्सरचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. या समस्येला तोंड देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. यातच कॅन्सरच्या लसीसंदर्भात ही मोठी अपडेट आली आहे.